महाराष्ट्र

ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टातही धक्का; सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाला स्थगिती नाही

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

ठाकरे गटाच्या वतीने लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी मान्य केलेली नाही. तसेच लोकसभा अध्यक्ष आणि संबंधित सहा खासदारांनी या प्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर दाखल करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडे असलेल्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी शिंदे गटाची साथ स्वीकारली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची लोकसभेतील ताकद वाढून खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सध्या स्थगिती न दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या प्रकरणातील अंतिम निर्णयासाठी पुढील सुनावणीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

4 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

5 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

5 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

5 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

6 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

6 तास ago