राजकीय

पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचताना चांगला संदेश द्यायचा आहे. त्यादृष्टीने आपापल्या मतदारसंघात काम होणे गरजेचे आहे. पक्षाच्या वाढीसाठी सकारात्मकपणे काम करावे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना बस प्रवासात ५०% सवलत, मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय यांसारख्या योजना महिलांसाठी सरकारकडून राबविण्यात येत असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

काल मलबार हिल येथील नंदनवन येथे शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिवदुर्गा महिला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी आमदार यामिनी जाधव,शिवसेना उपनेत्या संध्या वाढावकर, कला शिंदे , दक्षिण मुंबई संपर्क प्रमुख ममता पालव, नीलम पवार, श्रद्धा हुले, प्रिया राणे, हंसा मारू यांसह दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भायखळा, शिवडी, मलबार हिल, वरळी, मुंबादेवी आणि कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघातील महिला शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे ऊत्कृष्ट आयोजन शिवसेना उपनेत्या आशा मामीडी व सुशीबेन शाह यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago