शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात विषारी सर्पदंशाने शेतकऱ्याच्या गाईचा काही क्षणात तरफडून मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील वागदरे वस्ती नजीक घोणस या जातीच्या सापाने हरीभाऊ वागदरे यांच्या दुभत्या जर्शी गायीच्या तोंडास चावल्याने काही मिनीटातच त्या गाईचा सापाच्या विष बाधेने तरफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

वागदरे वस्तीत राहणारे गिताराम हरिभाऊ वागदरे यांचा नातू ओंकार हा नेहमी प्रमाणे जनावरे, शेळ्या घेऊन जवळील उसाच्या शेतीनजीकच्या मोकळ्या रानात जनावरे चारीत असताना उसाच्या कडेला चरत असलेल्या एका दुभत्या गायीस घोणस सारख्या अति विषारी सर्पाचा तोंडास दंश झाला. व गायीचा काही वेळातच दुर्दैवी मृत्यू झाला. ही पैलारु गाय दररोज 17 लिटर दूध देणारी होती. तिचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याने सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी ओंकारने सांगितले.

कवठे गावकामगार तलाठी ललिता वाघमारे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला असून पुढील कार्यवाही करुन नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव शिरुर तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती मंडल अधिकारी माधुरी बागले यांनी दिली. दरम्यान सध्या पडत असलेल्या पाऊसाने शेतीपिकांचे नुकसान झालेल्या कवठे येथील विविध ठिकाणचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.

परिसरात डिंभा धरणाच्या व पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आधीच बिबट्यांचा वावर मोठया प्रमाणात बेट परिसरात वाढला आहे. त्याचबरोबर डिंभा धरणाच्या कॅनॉल व नदी पात्रामधून विषारी सर्प या भागात मोठया प्रमाणावर येत आहे. त्यामुळे नागरीकांची व शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

सर्प दंशाने गायीचा मृत्यू झाल्याची घटना नक्कीच दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी उसाच्या कडेला आपली जनावरे चरावयास नेताना बिबट्यापासून वाचण्यासाठी जनावरांची व आपली दक्षता घेत सुरक्षितता म्हणून हातात काठी, मोबाईलचा आवाज सुरु ठेवावा. मेंढपाळ व शेतकऱ्यांनी गवतातून चालत असताना शक्यतो बुटाचा वापर करावा, असे मत शिरुर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

19 मिनिटे ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

15 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

15 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

15 तास ago