क्राईम

खंडणी उकाळणाऱ्या सहा गुंडाना शिरूर पोलीसांनी केले गजाआड

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील अभिषेक गंगावणे या युवकाचे रात्रीच्या सुमारास १० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करुन धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या 6 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना यश आले असून अजून 6 आरोपी अदयाप फरार आहेत.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १५) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शिरुर मुंबई बाजार येथुन शतपावली करीत असलेले अभिषेक ईश्वर गंगावणे (वय २२) रा. मुंबईबाजार शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांना 6 सिटर रिक्षा मधुन तलवारी, कोयता लोंखडी रॉड लाकडी दांडके घेऊन येउन १० लाख रुपयाची खंडणी मागुन मारहाण करून बळजबरी रिक्षा मध्ये बसवुन अपहरण करुन अभिषेक गंगावणे यांना शिरुर येथील दशक्रिया घाट येथे नेऊन विशाल काळे, उमेश जगदाळे, अविष्कार लांडे अक्षय परदेशी, कैलास ननवरे, देवानंद चव्हाण, हर्बल काळे, रुपेश लुनिया, अमोल लुनिया, दादा खिलारी सर्व (रा. शिरुर) व 2 अनोळखी यांनी त्यांचे गॅगसाठी १० लाख रुपयाची खंडणी मागुन दहशत निर्माण करुन तलवारी, कोयता, लोंखडी रॉड, लाकडी दांडके व हॉकीस्टीक यांनी अभिषेक ईश्वर गंगावणे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन जखमी केले होते. त्यांनतर गोपाळ यादव (रा. शिरुर) याने अभिषेक गंगावणे यांना फोन करुन पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

त्याबाबत अभिषेक ईश्वर गंगावणे याने दिलेल्या फिर्यादी वरुन शिरुर पोलिस स्टेशनमध्ये वरील आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा तपास पोसई विक्रम जाधव करत असताना सदर गुन्हयातील आरोपी नामे अविष्कार संभाजी लांडे (वय २3) रा. सोनार आळी, शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, अक्षय महेंद्रसिंग परदेशी (वय २३) रा. काचेआळी, शिरूर ता. शिरूर जि. पुणे, कैलास लक्ष्मण ननवरे (वय २३) रा. रामलींग ता. शिरुर जि. पुणे, हर्बल मनोहर काळे (वय २२) रा. ढोरआळी, शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, अमोल हेमंत लुनिया (वय २७) रा. रामलींग रोड, शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, अमोल उर्फ दादा अंकुश खिलारे (वय २५) रा. लाटेआळी, शिरुर यांचा शोध घेउन त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली असुन त्यांना (दि. २०)रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाले आहे. उर्वरीत आरोपी यांचा शोध घेणेकामी शिरुर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहेत.

सदर गुन्हयातील आरोपी पैकी काही आरोपी हे खुनाच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेले असुन त्या आरोपींनी वरील प्रमाणे टोळी करुन शिरुर शहरामध्ये दहशत निर्माण करुन लोकाना खंडणीची मागणी करीत असल्याची गोपनिय माहीती पोलिसांना मिळत आहे. याच प्रमाणे वरील आरोपी यांनी आणखी कोणास खंडणी मागीतली असल्यास किंवा खंडणी उकळली असल्यास त्याबाबत शिरुर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.

वरील कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, उपविभागीय पोलीस अधिकारीयशवंत गवारी शिरुर यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोसई एकनाथ पाटील, पोसई अभिजीत पवार, पोसई विक्रम जाधव, सहाय्यक फौजदार नजीम पठाण, सहा. फौजदार गणेश देशमाने, पोना. नाथा जगताप, पोना. बाळु भवर, पो. अंमलदार राजेंद्र गोपाळे, विनोद काळे, संतोष सांळुखे प्रविण पिठले, सचिन भोई या पथकाने केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; ससुनच्या डॉ अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा शिरुरच्या मुलानी-शेख कुटुंबाचा गंभीर आरोप

शिरुर (तेजस फडके) पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार (Pune Porsche car accident)…

12 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव (ता. शिरुर) हद्दीतील बाजारतळा जवळील एका…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात बजरंग दलाच्या गोरक्षकांमुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गोवंशांना जीवदान; तीन जणांवर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात कत्तलीसाठी जाणाऱ्या 5 जनावरांना वाचविण्यात शिरुर तालुक्यांतील…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल…

2 दिवस ago

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु…

3 दिवस ago

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

3 दिवस ago