शिरूर तालुका

भंगार व्यवसायिकाचे अपहरण करणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन पर्दाफाश

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर- चाकण रोडवर (दि. ११) जुलै रोजी रात्री ०९:३० च्या सुमारास भंगार व्यावसायिक नसीर अबुबकर खान (वय १९) (रा.गॅस फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याचे अज्ञात व्यक्तींनी त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण करुन त्याच्या खिशातील रोख 57 हजार रुपये व ॲपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मारहाण करुन जबरदस्तीने काढून घेतला. आणि त्याला (दि. १२) जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात स्थळी सोडून दिले होते. त्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

unique international school

सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी तपासाबाबत सूचना व मार्गदर्शन करत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवत गोपनीय बातमीदारांना सूचना देऊन तपास करत असताना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार १) करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे (रा.सोळु ता.खेड जि. पुणे) याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने स्विफ्ट डिझायर कारचा वापर करुन केला असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे सदर पथकाने तपास सुरु करुन, करण ऊर्फ हनुमंत शिवाजी कांबळे यास फुलगाव परिसरात चिंचबन हॉटेलच्या पाठीमागे शिवटेकडी जवळ पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे इतर साथीदार 2) रेहान हसन मोहम्मद खान (वय. 32) रा करंदी रोड गॅस फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे 3)अमर दिगंबर दिवसे (वय 20) रा. आंबेडकर नगर, पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी 4) आकाश उर्फ डुब्या सोपान पानपट्टे (रा. पूर्णा, ता.पूर्णा जि. परभणी) 5) इमरान अजीमूलला खान (वय 30) राहणार गॅस फाटा, खालसा धाब्याजवळ शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे 6) मारी उर्फ सुरज नागसिंध खंदारे व त्यांचा 7)एक विधी संघर्ष मित्र यांच्या मदतीने केल्याची कबुली दिल्याने त्याच्या इतर साथीदारांना तुळापूर रोड चिंचबन हॉटेल परिसरातून ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, मुकुंद कदम, पोलिस हवालदार जनार्दन शेळके राजू मोमीन, पोलिस नाईक मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे यांनी केली आहे. यातील सराईत गुन्हेगार करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे याच्यावर चाकण, दिघी, खेड तसेच बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही…

5 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय…

14 तास ago

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्याही जागीच दगावल्या…

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची…

17 तास ago

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित निलेश खाबिया व अनिल बांडे यांचा सत्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

एका रात्रीत केली तीन विद्युत रोहीत्रांची चोरी सविंदणे (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी…

2 दिवस ago

शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातील अनेकजण महाराष्ट्र शासन, आमदार, पोलिस, प्रेस तसेच…

2 दिवस ago