शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथिल रहीवाशी व क्रीडा प्रबोधनी, बालेवाडी येथील होतकरू नेमबाज अभिषेक लहू कामठे याने महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गट खुल्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत रौप्य पदक पटकावले असून महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात गौरवाची भर घातली आहे.
भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील नामवंत नेमबाजांचा सहभाग होता. अशा कठीण व स्पर्धात्मक वातावरणात अभिषेकने १० मीटर एअर रायफल शूटिंग या प्रकारात अत्यंत अचूक, संयमी आणि सातत्यपूर्ण नेम साधत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला व उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत अभिषेकने आत्मविश्वासपूर्ण खेळ दाखवत अनुभवी खेळाडूंना मागे टाकले. अंतिम फेरीत थोडक्यात फरकाने सुवर्ण पदक हुकले असले तरी त्याची कामगिरी प्रेक्षक व परीक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.या यशामागे क्रीडा प्रबोधनीचे प्रशिक्षक संदीप तरटे सर यांचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच वडील लहू कामठे यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा मोलाचा ठरला. कठोर सराव, शिस्तबद्ध दिनचर्या व मानसिक स्थैर्य यांच्या जोरावर अभिषेकने हे यश संपादन केल्याचे प्रशिक्षकांनी नमूद केले.
या यशाबद्दल क्रीडा प्रबोधनी, नेमबाजी संघटना, क्रीडाप्रेमी तसेच विविध सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिषेकचे अभिनंदन केले असून भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तो देशाचे नाव उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अभिषेक कामठेच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या नेमबाजी परंपरेला नवे बळ मिळाले असून ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंना तो प्रेरणादायी ठरत आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…