शिरूर तालुका

राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचा शिरूरमध्ये उत्साहात समारोप

प्रशासन-विद्यार्थी-नागरिक यांचा थेट संवाद; योजनांची माहिती देणारे २० हून अधिक स्टॉल

शिरूर (अरुणकुमार मोटे): अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय शिरूर आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम मंगळवारी शिरूर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी तसेच ग्राहक पंचायत संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तालुक्यातील सर्वच शासकीय विभागांनी लावलेले माहितीपूर्ण स्टॉल. महसूल, कृषी, महावितरण, पुरवठा, वनविभाग, भूमिअभिलेख, नोंदणी विभाग, पंचायत समिती आदी विभागांनी आपल्या योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, तक्रार नोंदविण्याची पद्धत आणि नागरिकांचे हक्क याबाबत थेट मार्गदर्शन केले.

“या कार्यक्रमात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”प्रत्येक व्यक्ती ही जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहकच असते. त्यामुळे ग्राहक या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. ऑनलाईन खरेदी करताना अनेक वेळा फसवणूक होते. अशा वेळी ग्राहक न्यायालय ही एक सक्षम आणि प्रभावी दाद मागण्याची व्यवस्था आहे. लोकांनी आमिषाला भुलून अवास्तव व्याज देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नयेत.”तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच तहसील, पंचायत समिती, नोंदणी कार्यालय यांसारख्या कार्यालयांना भेट देऊन प्रशासन कसे चालते हे समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यार्थ्यांचा प्रशासनाशी थेट संपर्क

कार्यक्रमानंतर उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयास भेट देऊन प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. फाइल कशा फिरतात, नोंदी कशा ठेवल्या जातात, नागरिकांच्या तक्रारी कशा हाताळल्या जातात याची प्रत्यक्ष ओळख झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता आणि समाधान दिसून आले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, भूमिअभिलेख उपअधीक्षक अमोल भोसले, सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, दुय्यम निबंधक ए. व्ही. जाधव, महावितरण उपअभियंता शरद माने, पुरवठा निरीक्षक सदाशिव व्हनमाने व दीपक केदार, वनविभागाचे भानुदास शिंदे उपस्थित होते.

ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा यांच्यातर्फे राज्याध्यक्ष अशोकराव भोरडे, राज्य सचिव बाबासाहेब थिटे, तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, उपाध्यक्ष अतुल पाचुंदकर, सचिव उद्धव जाधव, संघटक डॉ. ओंकार जाधव, योगेश शेंडगे, बाळासाहेब चव्हाण, गोपाळ भुजबळ, आबासाहेब थोरात, मच्छिंद्र झरेकर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे ग्राहकांचे हक्क, तक्रार निवारण व्यवस्था, ऑनलाईन फसवणूक, सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत जनजागृती झाली असून विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाचा हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष जनतेला उपयोगी ठरणारा ठोस उपक्रम ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago