शिरूर तालुका

शिरूर भूमी अभिलेख विभागातील दिरंगाईवर कारवाई

उपअधिक्षक व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड 

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शिरूर तालुक्यातील नवनाथ तुकाराम डोमाळे यांच्या द्वितीय अपील अर्जात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे यांनी ऐतिहासिक निर्णय देत, कामकाजात दिरंगाई करणा-या शिरूर भुमिअभिलेख उपअधिक्षक अमोल भोसले व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांना वेळेवर हक्काची सेवा न दिल्याने हा निर्णय घेतला गेला असून, हा निर्णय अनेक नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

डोमाळे यांनी विविध मोजणी प्रकरणांतील प्रमाणित नक्कल, हरकत अर्जांची प्रती आणि मोजणी नकाशे मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी तथा उप अधीक्षक भूमी अभिलेख अमोल भोसले यांनी वेळेत योग्य सेवा पुरवली नाही. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे, अपूर्ण कागदपत्रे आणि चुकीची माहिती दिली गेल्याचेही अपीलात अधोरेखित करण्यात आले होते.

जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख पुणे तथा द्वितीय अपील अधिकारी मंगला कमाने यांनी सदर प्रकरणात सुनावणी घेत, उपलब्ध पुराव्याच्या आधारे अपीलदाराच्या बाजूने निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, संबंधित अधिकारी यांनी नियमबाह्य पद्धतीने कामकाजात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकी ५०० दंड आकारण्यात येत आहे. याशिवाय अपूर्ण नक्कला आणि हरकत अर्जांची सर्व माहिती तीन दिवसांत अपीलदाराला पुरवावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

यापुढील काळात अधिसूचित सेवांसाठी कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे नमूद करत अधिकाऱ्यांना भविष्यातील सेवा वेळेत देण्यास सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. एकुणच शिरूर भुमि अभिलेख कार्यालयात अनेक नागरिकांची कामे बऱ्याच महीन्यांपासून प्रलंबित असून नागरीकांना कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येत असल्याचे कवठे येमाई येथील शेतकरी दत्तात्रय वामन सांडभोर यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago