शिरूरः घोडगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच शिरूर वकील बार असोसियनचे माजी अध्यक्ष रंगनाथ थोरात (वय ६२, रा. आमदाबाद) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरळात शोककळा पसरली आहे.
पुण्यातील संचेती हॉस्पीटल येथे उपचार घेत असताना त्यांचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यांनी राजकीय, सामाजिक, वकील अशी अनेक पदे भुषविली आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचा नगर-पुणे हायवेवरील शिरूरुजवळील बोऱ्हाडे मळा येथे त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते पुण्यातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
अतिशय मनमिळावू, शिरूर तालुक्यातील प्रत्येकाच्या सुखदुखात सामील होणारे तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार अशोक पवार यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या मृत्यूने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त असून, चांगला सहकारी गमावल्याची भावना नागरीक व्यक्त करत आहे.
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…