शिरूर तालुका

शिक्रापुरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात असलेल्या शरद बँकेजवळ काही नागरिक आलेले असताना त्यांना एक व्यक्ती मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. याबाबत म्शिती मिळताच पोलीस नाईक रोहिदास पारखे, स्वप्नील गांडेकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला असता तेथे मृत व्यक्ती त्याचे अंदाजे ३५ ते 40 वर्षे, रंगाने सावळा, अंगात निळ्या रंगाचा शर्ट व त्यावर काळ्या रंगाचे जर्किन व निळ्या रंगाची प्यांट तसेच त्याच्या हातावर निळ्या रंगाने N व त्यावर आडवी रेषा ओढलेली असे गोंधन असल्याचे आढळून आले मात्र व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.

याबाबत सुनील काशीराम पटेलवाड (वय २०) रा. पाटवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago