मुख्य बातम्या

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याच आव्हान दिलं होतं. त्यावर पुराव्यांचा ट्रेलर दाखवल्यावर आढळराव पाटलांनी हा आपल्याला घेरण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, कोल्हेंच्या कोणत्याच आरोपांना उत्तर देणार नसल्याचं सांगितलं. त्यावर डॉ. कोल्हे यांनी ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद झाल्याचं सांगत आढळराव पाटलांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय.

महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारुन कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय, असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले होते.

यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असं आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत डॉ. कोल्हे यांनी आजच्या शिरुर तालुक्याच्या दौऱ्यात, पाणबुडीवरुन क्षेपणास्त्र डागण्याचा प्रश्न एकदा नव्हे तर दोनदा विचारल्याच पुराव्यानिशी डॉ. कोल्हे यांनी दाखवून दिलं. यानंतर लगेच आढळराव पाटील यांनी हा सगळा आपल्याला घेरण्याचा प्रकार असुन डॉ. कोल्हे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायच नाही असं सांगितलं. यावर कोल्हेंनी आढळराव पाटलांना चांगलचं धारेवर धरलं.

 

डॉ. कोल्हे म्हणाले की, सुरवातीलाच सांगितलं होतं, आव्हान दिल्यानंतर शब्द फिरवू नका. पण ट्रेलर बघितल्यावरच त्यांची बोलती बंद झाली. पानबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा शिरुर लोकसभा मतदार संघाशी आणि विकासासाठी काय संबंध याच उत्तर त्यांनी द्यावं. तीन टर्म विश्वास ठेवून जनतेने त्यांना संसदेत पाठवलं होत, मग कोणत्या कंपनीच भलं करण्यासाठी हे प्रश्न विचारले, याच उत्तर आढळरावांनी द्यायला हवं.

 

आज सगळ्या सरड्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असेल इतक्या पटकन त्यांनी रंग बदलेत, असा टोला लगावत आढळराव पाटलांनी संरक्षण खात्याला आवश्यक असणाऱ्या सांधनांच्या खरेदी संदर्भातच प्रश्न का विचारलेत, याच उत्तर देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं उत्तर देणार नाही, अस म्हणून चालणार नाही, अशा शब्दात डॉ कोल्हे यांनी आढळराव पाटलांना जाहीरपणे सुनावलं आहे.

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago