शिरूर तालुका

मोबाईल टॉवरमधून २० हजारांची कॉपर केबल चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रीतमप्रकाश नगर येथील मोबाईल टॉवर (इंडस टॉवर क्र. 1052242) येथून अज्ञात चोरट्याने तब्बल २०,००० रुपयांच्या कॉपर व सोलर केबल्सची चोरी केली आहे. ही घटना १३ जून रोजी संध्याकाळी ५ ते १४ जून रोजी रात्री २.३५ च्या दरम्यान घडली आहे. याबाबत फिर्याद युवराज ईरभान वानखेडे (वय ५६), रा. कुंभारवाडा, शिक्रापूर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

चोरी गेलेल्या साहित्याची माहिती

बॅटरीबॅक पॉवर केबल (१० मीटर) – ₹३,५००

DCDB कॉपर केबल (२० मीटर) – ₹३,५००

सोलर कॉपर केबल (०७ मीटर) – ₹३,०००

बॅटरीबॅक सेल कॉपर (०२ मीटर) – ₹२,०००

सोलर कॉपर आर्मड केबल (१२० मीटर) – ₹६,००0

BTS कॉपर केबल (३० मीटर) – ₹२,०००

त्यानंतर, १४ जून रोजी दुपारी २.१७ वाजता, मौजे तांदळी येथील घोडनदी पुलाजवळ, काष्टी ते न्हावरा जाणाऱ्या रस्त्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार भगत करीत आहेत. स्थानिक पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

4 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

18 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

18 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

18 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

18 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

18 तास ago