शिरूर तालुका

आमदाबाद गावातील ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या कॉइल चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. ही चोरी १८ मार्च रात्री ११ : ३० ते १९ मार्च रोजी सकाळी ८: ३० या वेळेत घडली असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनिल अशोक घोबाळे (वय ३३), व्यवसाय – नोकरी, रा. कवठे येमाई, (ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,आमदाबाद गट नंबर ६३ मधील २५ / २२ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या कॉइलची चोरी केली. चोरी करण्याआधी चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडून मोठे नुकसान केले. या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 208/2025 अंतर्गत करण्यात आली असून भारतीय विद्युत अधिनियम 2003 चे कलम 136 आणि भारतीय दंड संहिता कलम 324 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे हे करत आहे.

वीजपुरवठ्यावर परिणाम

ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरीच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होतो, परिणामी स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या घटनेमुळे अमदाबाद गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचा परिणाम शेतकरी आणि स्थानिक व्यवसायांवरही झाला आहे.

शिरूर तालुक्यात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि वीज वितरण कंपन्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, गस्त वाढवणे आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेणे यांसारख्या उपाययोजना केल्या गेल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच आरोपींना गजाआड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने शिरूर पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

29 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

14 तास ago