शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे एका तरुणास तिघा जणांनी लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन नारायण पानगे (वय २८), व्यवसाय – शेती, रा. निमगाव दुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २५मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या घराच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आराम करत होते. त्यावेळी आरोपी भागा यशवंत हजारे, नवनाथ भागा हजारे, आणि मच्छिंद्र भागा हजारे हे तिथे आले.
नवनाथ हजारे याने फिर्यादीला विचारले की, “तू माझ्या वडिलांना सकाळी शेतामध्ये का बोललेस?” यावरून वाद उफाळला. नवनाथ हजारे याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पाठीत जोरदार मारले. त्यानंतर मच्छिंद्र हजारे आणि भागा हजारे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नवनाथ हजारे याने पुन्हा लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पाठीला, कमरेच्या खाली, पायाला आणि मानेवर मारहाण करत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, मच्छिंद्र हजारे याने तेथील दगड उचलून फिर्यादीच्या दिशेने भिरकावला, जो त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या खाली लागून जखमी झाला. या हल्ल्यात फिर्यादीला दुखापत झाली असून, त्यांनी आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे.या घटनेचा पुढील तपास टाकळी हाजी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार आगलावे हे करत आहे
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …