भूमीहीन व बेघर दिव्यांगांचे पुण्यात दिव्यांग जन आंदोलन
शिक्रापूर (शेरखान शेख): प्रहार अपंग क्रांती आंदोलन आयोजित पुणे जिल्ह्यातील भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग जन आंदोलन करण्यात आले असून यावेळी दिव्यांग बांधवांना हक्काचे घर मिळावे अशी मागणी प्रहार संघटनेचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी केली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच अपंग संघटनेने आंदोलन केले असून सध्या हजारो दिव्यांगाना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून ते बेघर आहेत, तर दिव्यांगांचा राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिव्यांग बांधव झोपडी टाकून राहत आहे तर कोणी मंदिर, एस टी स्थानक, बस स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी जेथे सोय होईल तेथे निवारा शोधत आहे. दिव्यांग बांधवांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी दिव्यांगांना घरे देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते मात्र अद्यापही त्याबाबत काही उपाययोजना नसल्याने भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात प्रहार संघटनेच्या सुरेखा ढवळे, पुणे जिल्हाध्यक्ष अनिता कदम, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रियाताई लोखंडे, दौंड तालुकाध्यक्ष सुभाष दिवेकर, शिरूर तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, खेड तालुकाध्यक्ष जीवन टोपे, भोर तालुकाध्यक्ष बापू कुदळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, जिल्हा सचिव विजय तांबे, हवेली तालुकाध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, शिक्रापूरचे सुरेश पाटील, बाळासाहेब काळभोर, नंदू राऊत, शिवाजी शिंदे, ज्योती हिवरे, बापू कोकरे, दत्ता बहिरट, नंदू कोळेकर, शरद दिवेकर यांसह आदी दिव्यांग पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिव्यांग बांधवांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…