शिरूर तालुका

केंदूर व करंदीच्या शालेय गरजू मुलांना मिळाला मदतीचा हात

केंदूरच्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर मदतीने फुलले चैतन्य

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): केंदूर (ता. शिरुर) सह करंदी येथील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याने येथील शालेय गरजू मुलांना मदतीचा हात मिळाला आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व करंदी येथील विद्या विकास मंदिर या शाळेतील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून नुकतेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी करंदी गावच्या पोलीस पाटील वंदना साबळे, डॉ. नितीन सोनवणे, प्राचार्य रणजित गावित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, अनिल साकोरे, चंद्रकांत थिटे, संजय जोहरे, मोतीराम वागतकर, मनोज दोंड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, करंदीचे प्राचार्य दत्तात्रय बनसोडे, डॉ. प्रतिक पलांडे यांसह आदी उपस्थित होते.

शिरुर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या केंदूर गावात आदिवासी ठाकर समाजातील खूप मोठ्या प्रमाणात कुटूंब वास्तव्यास असून येथील सर्व मुले केंदूर येथील शाळेत शिक्षण घेतात. मात्र सदर मुलांना अनेक शैक्षणिक अडचणी येत असल्याने स्वरुपाची मदत मिळाल्याने या मुलांना खूप मोठा आधार मिळत असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब धस यांनी केले तर चंद्रकांत थिटे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल…

8 तास ago

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु…

15 तास ago

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 दिवस ago

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

3 दिवस ago

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण…

3 दिवस ago