शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

शिंदोडी (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील एका कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन त्यांचा राजीनामा घेत त्यांना कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले होते. या प्रकरणात फिर्यादी रेश्मा वाळके यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत वकिलांमार्फत आपली बाजु मांडली होती. फिर्यादी आणि आरोपी यांच्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके या दोन्ही बाप-लेकीचा जामीन फेटाळला आहे.

करडे येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भागीदार रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी आर्थिक फसवणुक केल्याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दाखल केली होती. परंतु फिर्याद दाखल होऊन दोन महिने उलटुनही चारही आरोपी मोकाट होते. त्यामुळे माजी सैनिक पत्नीने पुणे ग्रामीणचे तात्कालिन पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडे वारंवार पाठपुरावा चालु ठेवला होता.

त्यानंतर अखेर १९ मार्च २०२५ रोजी यातील मुख्य सुत्रधार सचिन संभाजी वाळके याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्याला १० दिवस पोलिस कोठडी आणि २ दिवस न्यायायलीय कोठडी देण्यात आली. त्यानंतर शिरुर न्यायालयाने त्याचा जामीन मंजुर केला. त्यानंतर संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळावा यासाठी वकिलांमार्फत युक्तीवाद केला. परंतु न्यायालयाने फिर्यादी आणि आरोपी या दोघांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके या बाप-लेकीचा जामीन फेटाळला आहे.

शिरुर पोलिसांचा योग्य तपास अन आरोपीचा जामीन नामंजुर…

करडे माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणाचा तपास सुरवातीला शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे होता. परंतु एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने जाणीवपुर्वक यात हस्तक्षेप करत तो तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके यांच्याकडे वर्ग केला. परंतु या दोघांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताही चुकीचा दबाव न घेता या केसचा सखोल तपास करुन सत्यता समोर आणली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत फिर्यादी रेश्मा वाळके यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले की, या प्रकरणातील मुख्य सुत्रधार सचिन वाळके याचा जामीन हा चुकीच्या युक्तिवादावर झाला असुन शिरुर न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तीचा सचिन वाळके याने भंग केला आहे. तसेच जिल्हा सत्र न्यायालयाने ज्या युक्तिवादावर आरोपी संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके यांचा जामीन नामंजुर केला आहे. त्याच मुद्यावर आम्ही जिल्हा सत्र न्यायालयाकडे सचिन वाळकेचा जामीन रद्द करण्यात यावा यासाठी अर्ज करुन दाद मागणार आहोत.

 

आरोपी संभाजी वाळके यांनी न्यायालयात खोटं पॅनकार्ड सादर करुन स्वतःच वय ६८ वर्षे असल्याच भासवलं. परंतु आम्ही खरं पॅनकार्ड सादर करुन संभाजी वाळके यांच वय ६८ नव्हे तर ४८ असल्याच न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिलं. तसेच कंपनी ॲक्टच्या प्रावधानांचा गैरवापर करत फिर्यादी रेश्मा वाळके यांच्या खोट्या सहया करुन त्यांचा राजीनामा घेण्यात आला. मुख्य सुत्रधार सचिन वाळके याने कंपनीच्या खात्यातुन लाखों रुपयांचा अपहार केला आहे. तसेच CA आणि CS यांनाही अटक करणे बाकी असल्यामुळे रेश्मा वाळके यांना अजुन न्याय मिळालेला नाही.

ॲड आनंद भगत 

फिर्यादीचे वकील 

(क्रमश:)

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

शिरुर; माजी सैनिक पत्नीच्या फसवणुक प्रकरणात झारीतील शुक्राचार्य असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची लुडबुड सुरुच…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

9 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

18 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago