Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील एका कंपनीत आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी माजी सैनिक पत्नी रेश्मा राहुल वाळके (वय ३७) (रा. करडे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे (दि २७) जानेवारी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केलेली असताना आठ दिवस उलटूनही या चार आरोपीना अटक झालेली नाही. या आरोपीना शिरुर पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारीच मदत असल्याचा गंभीर आरोप करत थेट त्याची लेखी तक्रार रेश्मा वाळके यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे केली असल्याने आता या प्रकरणाने नवीन ‘वळण’ घेतले आहे.

 

करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare feeds india Private Limited) या कंपनीत माजी सैनिकाच्या पत्नी असलेल्या रेश्मा राहुल वाळके या कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन त्यांचा राजीनामा घेत त्यांना कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले होते.

 

याबाबत त्यांचे पती राहुल वाळके आणि रेश्मा वाळके हे कंपनीत विचारणा करण्यासाठी गेलेले असताना सचिन संभाजी वाळके याने दोघा पती-पत्नीला “पुन्हा या कंपनीच्या आवारत दिसला तर तुम्ही दोघे परत कुठेच दिसणार नाहीत याद राख, माझ्या इतके कोणी वाईट नाही” असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने त्या दोघांनी संभाजी दगडु वाळके त्यांची मुलगी प्रियांका संभाजी वाळके आणि त्यांचा मुलगा सचिन संभाजी वाळके सर्व (रा. करडे,ता.शिरुर, जि. पुणे) तसेच एक अनोळखी सी ए (CA)आणी सी एस (CS) यांच्याविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन येथे कायदेशिर फिर्याद दाखल केलेली आहे.

 

परंतु वाळके दांपत्याने शिरुर पोलिस स्टेशनला चार जणांविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीच्या काही समर्थकांनी वाळके यांच्या घरावर रात्रीच्या वेळेस दगडफेक करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न करत केस मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. तसेच शिरुर पोलिस स्टेशनचा एक वरिष्ठ अधिकारी आरोपीना मदत करत असल्याने त्याबाबत रेश्मा वाळके यांनी थेट पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

 

शिरुर पोलिस स्टेशनमध्ये चहा पेक्षा किटली गरम…? 

शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके या घटनेचा कसुन तपास करत आहेत. परंतु याच पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारी यामध्ये खोडा घालत असल्याचा गंभीर आरोप वाळके दांपत्याने केला असुन याबाबत संबंधित अधिकाऱ्याची थेट लेखी तक्रारच पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे या पती-पत्नीने केली आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एखाद्या गुन्ह्याच्या तपासाबाबत गांभीर्याने लक्ष घालुन तपास अधिकाऱ्यांना वेळोवेळी सुचना देत असताना जर त्याच पोलिस स्टेशन मधील दुसरा अधिकारी आरोपीना मदत करत असेल तर शिरुर पोलिस स्टेशनची “चहा पेक्षा किटली गरम” अशीच अवस्था झाली की काय अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. याबाबत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण…?