शिरूर तालुका

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन शिरुर येथे झालेल्या बैठकीत तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी दिले.

यावेळी जिल्हाकार्यकारणी शरद पुजारी, शिरुर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जालिंदर आदक, हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, उपाध्यक्ष सुनिल पिंगळे, भाऊसाहेब खपके, योगेश भाकरे, माजी शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे, मंदार तकटे, सुर्यकांत शिर्के, बबन वाघमारे, आकाश भोरडे, हवेली तालुका उपाध्यक्ष गणेश धुमाळ, दिनकर जोगदंड, सुखदेव सुरवसे आदिंसह तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.

शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल, शहर भाजपाचे कार्याध्यक्ष मितेश गादिया, राष्ट्रवादी लिगल सेलचे शहराध्यक्ष रविंद्र खांडरे यांसह नागरिकांनी तालुकाध्यक्षपदी बढे यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

शिरुर तालुका पत्रकार संघाच्या सचिवपदी अर्जुन बढे यांनी गेले दहा वर्ष काम केलेले असुन त्यांनी पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील भैरवनाथ देवस्थानचे 5 वर्ष अध्यक्षपद भूषविले आहे. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, तालुका संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना नवनियुक्त तालुकाध्यक्ष अर्जुन बढे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

1 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

1 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

1 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा…

2 दिवस ago

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…

वाघोली (प्रतिनिधी) लोणीकंद-थेऊर रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ मालवाहू कंटेनर आणि इको कार…

2 दिवस ago