महाराष्ट्र

राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी…

मुंबई: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान राज्यपालांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी अशी विनंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पत्रात महेश तपासे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago