शिरूर तालुका

धर्मांतराच्या विरोधात शिरूरमध्ये सकल हिंदू समाजाचा एल्गार; धर्मांतरबंदी कायद्याची जोरदार मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): सांगली येथील यशवंतनगरमधील सात महिन्यांची गर्भवती महिला ऋतुजा सुकुमार राजगे हिच्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या दबावाखाली आत्महत्येच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर व शिरूर तालुक्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटनांना विरोध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाची सुरुवात शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महिलांचा लक्षणीय सहभाग या मोर्चात दिसून आला. ‘प्राण सोडला पण धर्म नाही सोडला’, ‘धर्मांतर बंदी कायदा करा’, ‘हिंदूंचे धर्मांतर थांबवा’ अशा आशयाचे फलक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व ऋतुजा राजगे यांचे छायाचित्र हातात घेऊन कार्यकर्ते जुन्या पुणे-अहिल्यानगर मार्गे मोर्चा काढत शिरूर तहसील कार्यालयावर दाखल झाले.

शिरूर तहसील कार्यालयात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत आमदार महेश लांडगे, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, भाजप प्रदेश सचिव अॅड. वर्षा डहाळे, नानाजी पडळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.

“राज्यात धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू व्हावा”; आमदार लांडगे यांची आग्रही मागणी…

या वेळी आमदार महेश लांडगे यांनी, “राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. हा कायदा कडक असावा व देशातील इतर राज्यांनाही प्रेरणा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे,” असे स्पष्ट केले.

महिला आयोगावर टीका..

अॅड. वर्षा डहाळे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत, “ऋतुजा राजगे यांचा मृत्यू इतका गंभीर असूनही महिला आयोगाने अजूनही कोणतीही दखल घेतलेली नाही. महिला आयोग झोपेत आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला. या मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, शिवबा संघटना, सकल हिंदू समाज, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी सभेचे प्रास्ताविक नामदेव घावटे यांनी केले. निवेदन सादर व सूत्रसंचालन गणेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन संग्राम भंडारी यांनी केले.

अनधिकृत चर्च पाडण्याचा अल्टिमेटम…

“शिरूर तालुक्यातील काठापूर, पिंपरखेड, जांबुत, टाकळी हाजी व इतर भागांतील अनधिकृत चर्च पुढील तीन महिन्यात हटविण्यात यावेत. हिंदू समाजातील व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा मला विधानसभेत उभं राहून बोलावं लागेल. सध्या विनंती करतो, पुन्हा ती संधी देणार नाही,” असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

13 तास ago