शिरूर तालुका

हिंदी सक्तीच्या विरोधात तळेगाव ढमढेरे येथे शिवसेनेचे जाहीर आंदोलन

राज्य सरकारच्या जी.आर.ची प्रत फाडून केली होळी, जोरदार निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणारा जी.आर. जाहीर करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते सचिनभाऊ अहिर आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर यांच्या सूचनेनुसार, तसेच पुणे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड व संपर्कप्रमुखमनोज इसवे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनात हिंदी सक्तीच्या जी.आर.ची होळी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “मराठीवर अन्याय सहन केला जाणार नाही”, “हिंदी सक्ती बंद झालीच पाहिजे”, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान राज्य सरकारविरुद्ध संतप्त भावना व्यक्त करत मराठी अस्मितेचा बुलंद आवाज उठवण्यात आला.

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख मच्छिंद्र तात्या गदादे,तालुका प्रमुख पोपट शेलार, महिला तालुका संघटक, महिला तालुका संघटक चेतना ढमढरे, तालुका सल्लागार मधुकर भंडारी, समन्वयक शिवाजी मचाले,अनिल करपे, कौस्तुभ होळकर, राहुल शिंदे, गणेश शिवले,विभागप्रमुख कुंडलिक पवार, उपविभागप्रमुख अनिल सातकर व भगवान सातकर,दिपक इंगळे, सचिन मुळे इतर कार्यकर्ते व शिरूर तालुक्यातील आजी-माजी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, व शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनातून स्पष्ट संदेश देण्यात आला की, मराठीवर अन्याय सहन केला जाणार नाही आणि महाराष्ट्रात मराठीच पहिले स्थान असावे, हीच शिवसेनेची ठाम भूमिका आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

5 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago