शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी

शेतकऱ्यांची पोलिसांना गांभीर्याने तपास करण्याची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात विद्युत मोटार चोरटयांनी पुन्हा एकदा धुमाकुळ घातला असून एकाच रात्री तब्बल 5 शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

घोडनदी परिसरातील विद्युत पंप व केबल चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे. बुधवारी (दि. १२) रात्री निमगाव दुडे (ता. शिरुर) परिसरातील भाऊसाहेब चंदर दाते, प्रभाकर गेणभाऊ रावडे, शिवनाथ गेणू रावडे, दशरथ रामभाऊ शिंदे, सुमित भानुदास कांदळकर या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची एकाच रात्री चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत कवठे येमाईचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घोडे, अविनाश पोकळे व परीसरातील शेतकऱ्यांनी यांनी व्यक्त केले.

शिरुर तालुक्याच्या बेटातील टाकळी हाजी – कवठे येमाई परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा हंगाम अत्यंत खडतर ठरत असून या वर्षी कडक उन्हाची झळ लवकरच बसण्यास सुरुवात झाली आहे. अशाही परिस्थितीत मेहनतीने आणि धैर्याने शेतातील पिके जागविण्याचा प्रयत्न करत असताना आर्थिक संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना आता चोरांकडून कृषी विद्युत पंप व केबल चोरीचे प्रकार वाढल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.

बी बियाणे, खते, औषधे, डिझेल, पेट्रोलचे वाढलेले बाजारभाव त्याचबरोबर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष , विजेचा सततचा लपंडाव, सातत्याने बदलणारे हवामान , बिबट्याची दहशत अशा सर्वच बाजुंचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत भुरट्या चोरांचा शेती साहित्य चोरण्याचा उपद्रव सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

टाकळी हाजी, निमगाव दुडे, माळवाडी, म्हसे, कवठे येमाई, मलठण या परिसरात बिबट्यांच्या मोठा वावर असल्याने पशुधन वाचविण्या बरोबरच आपण जगायचे कसे ? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. बिबट्यांच्या दहशतीने शेतकरी सूर्यास्तानंतर घरीच थांबणे योग्य समजत आहेत.याचा फायदा घेत दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी चोर डल्ला मारत आहेत. पोलीस यंत्रणेने अशा सराईत चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी निमगाव दुडेचे माजी सरपंच दिपक दुडे, अमोल घोडे यांनी केली आहे.

अनेक शेतकरी अर्थिक अडचणीत आहेत. केबल आणि कृषी पंपाच्या चोऱ्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करता ही हानी भरून काढणे जिकिरीचे आहे. या चोरांचा तपास लागत नसल्याने सामान्य जनतेच्या मनात पोलिसांविषयी शंका उपस्थित होत आहे तर चोर पकडले जात नसलेने चोरांचे मनोबल मात्र वाढले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago