क्राईम

शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर झालेल्या निर्घुण खुणाची अद्याप उकल होईना…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी परीसरात एकाचा निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडले. तर एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह (दि. १2) मार्च रोजी आळढून आल्याने शिरूर -श्रींगोदा तालुक्यात मोठी खळबळ माजली होती. या घटनेबाबत गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, शिरूर पोलीस स्टेशन ,तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन याबाबत सखोल समांतर तपास करून अनेक जणांची चौकशी करीत आहेत. परंतु अद्यापपर्यंत या खुणाबाबत कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याने पोलिसांपुढे मोठी डोकेदुखी वाढली आहे. हा निर्घृण खून कोणी व कशासाठी केला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून यातील आरोपींना शोधून काढणे जिकरीचे बनले आहे.

महाराष्ट्रसह अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले असून असा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमांना तात्काळ गजाआड करण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी 18 ते 22 वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरी मध्ये आढळून आला आहे. या मृत्यू देहाचे शीर, दोन हात ,व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळून आल्या आहे. हा मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी ता. श्रीगोंदा येथील शिरूर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

मिसिंगचे प्रमाण वाढले… 

शिरूर पोलीस स्टेशन येथे गेल्या दीड महिन्यापासून हरवलेच्या, पळून गेल्याच्या, पळून नेल्याच्या अशा एकुण तब्बल १२ प्राप्त झाल्या आहेत. मिसिंगच्या, अल्पवयीन मुली, महिला, पुरुष , पळवून नेल्याच्या,पळून गेल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत असून या गुन्ह्यांचा तपास करणे शिरूर पोलिसांपुढे आव्हान बनले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

10 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

16 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago