शिरूर तालुका

शिरुरच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त माहेरच्या करुणालय शाखेत अन्नदान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या काही वर्षापासुन महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा राणी कर्डिले यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत आगळावेगळा उपक्रम राबवत माहेर संस्थेच्या सणसवाडी येथील माहेर संस्था संचालित करुनालय शाखेतील निराधार ,आजारी आणि वयोवृद्ध लोकांना जेवण देत अन्नदान केले.

राणी कर्डीले यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करत समाजापुढे एक आदर्श समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कर्डीले यांनी आत्तापर्यंत आदिवासी कल्याण, वयात येणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या, वीटभट्टी वरील मुलांसाठी शाळा, तसेच चालते व फिरते वृद्धाश्रम चालवण्याचे कार्य करीत आहेत.

तसेच वर्षभर विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिरे, वेगवेगळ्या उपक्रमामधुन समाजात, रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने प्रेरणादाई पुरस्कार वितरण करत असतात. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून नेहमी सामाजिक उपक्रम चालू असतात. जिथे सर्वसामान्य लोकांना गरज आहे तिथे त्या नेहमी मदतीला उभ्या असतात. सर्वच क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्रातील विविध संस्थेमार्फत पुरस्कारही देण्यात आलेले आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शिरुर शहरध्यक्षा गिता आढाव, उद्योजक बाळकृष्ण कर्डीले, संदीप कुटे, माहेर संस्थेचे संचालक रमेश दुतोंडे, क्रिडाशिक्षक प्रशांत गायकवाड, प्रिया ढोबळे, जेनिट सिस्टर, पत्रकार तेजस फडके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश दुतोंडे तर आभार विजय तवर यांनी केले.

 

आपण फटाके, पार्टी करुन वाढदिवस साजरे करतो. पण ज्या लोकांना बाहेरच्या जगात काय चाललय, आनंद काय असतो हे माहीत नसते. त्यामुळे माहेर संस्थेच्या लोकांमध्ये जाऊन माझा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे मला खुपच मानसिक समाधान मिळाले. यापुढेही असेच सामाजिक काम करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे. तसेच जेव्हा कधी काही अडचण असेल तेव्हा नेहमीच मी माहेर संस्थेसोबत सोबत आहे.
राणी कर्डीले
(सामाजिक कार्यकर्त्या, रामलिंग)

शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू

करडे येथे ट्रॅक्टर व हायवा कंपनीत लावली नसल्याने काठी व हॉकीस्टीकने कंपनीच्या मॅनेजरला जबर मारहाण

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

10 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

10 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

14 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

14 तास ago