करडे येथे ट्रॅक्टर व हायवा कंपनीत लावली नसल्याने काठी व हॉकीस्टीकने कंपनीच्या मॅनेजरला जबर मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) करडे (ता. शिरुर) येथील प्राईमकोल्ड स्टोरेज प्रा. लि. कंपनीमध्ये ट्रॅक्टर आणि हायवा गाडी कंपनीमध्ये न लावल्याचा राग मनात धरून चार जणांनी कंपनीचे मॅनेजर श्रीकांत शिवाचरण साहू याला काठी व हॉकी स्टिकने जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी १ ) अमोल विलास देशमुख २) प्रणव राजेंद्र जगदाळे ३) अमोल नितीन देवरे व इतर अनोळखी १ इसम या चार जणांवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १७ सप्टेबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मॅनेजर श्रीकांत शिवाचरण साहू व त्यांच्या कंपनीतील तुषार संकपाळ हा सुरक्षारक्षक दुचाकीवर करडे (ता.शिरुर) गावच्या हद्दीत साहू राहत असलेल्या खोलीत सोडवण्यास आला. तो साहू याला सोडुन माघारी गेला. त्यावेळी श्रीकांत शिवाचरण साहू खोलीत जात असताना चारचाकी स्वीप्ट कार क्रं एम. एच. १४ एफ. जी. ००७८ ही श्रीकांत साहू यांच्या समोर येऊन थांबली.

त्यातून अमोल विलास देशमुख, प्रणव राजेंद्र जगदाळे व अमोल नितीन देवरे (रा. करडे ) असे तिघेजण गाडीतुन उतरले. त्यानंतर दुचाकीवर एक जण अनोळखी व्यक्ती आला. त्यातील अमोल देशमुख याने श्रीकांत साहुला तु माझा ट्रॅक्टर व हायवा कंपनीत का लावली नाही…? असे म्हणुन हाताने साहू यांच्या तोंडावर मारले. त्यावेळी त्यांच्यासोबत आलेले प्रणव जगदाळे व अमोल देवरे यांनी गाडीतून हाँकी स्टीक व लाकडी काठी काढली. त्यातील एक काठी अमोल देशमुख यास दिली व त्या काठीने व हॉकी स्टीकने त्यांनी श्रीकांत साहू यास मारण्यास सुरुवात केली.

त्यांनी श्रीकांत साहू याच्या पाठीवर व पायावर लाकडी काठीने व हाँकी स्टीकने मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या अनोळखी माणसाने श्रीकांत साहू याला पाठीमागुन धरुन ठेवले होते. ते मारहाण करत असताना श्रीकांत साहू मोठ्याने ओरडले असता त्यावेळी त्यांची पत्नी श्रद्धांजली ही खाली आली व मोठ्याने ओरडली. त्यावेळी ते चार जण तिथुन निघुन गेले.

 

या घटनेनंतर श्रीकांत साहू यांनी डायल ११२ ला फोन केला. त्यानंतर शिरुर पोलीस घटनास्थळी आले आणि साहू यांना उपचाराकरीता न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात घेवुन गेले. या मारहाण प्रकरणी श्रीकांत साहू यांच्या फिर्यादीवरुन एक अनोळखी व्यक्ती तसेच करडे (ता. शिरुर) येथील तीन जण अशा एकुण चार जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असुन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू

शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

1 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago