dead
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर बाह्य महामार्गावर पुणे-अहमदनगर रस्त्यावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत रमेश पांडुरंग चैधरी (वय ६५ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. सतराकमान पुलाजवळ शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याचे पुर्वी शिरूर बाह्य पुणे – नगर महामार्गावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर पुणे अहमदनगर हायवे रोडवर अहमदनगर बाजुकडे जाणारे लेनवर एक ४५ वर्षीय पुरुषाला अनोळखी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून धडक दिली. अपघात करून त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रताप टेंगले करीत आहेत.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…