शिरूर तालुका

नागरगाव चौफुला येथे चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; पती, पत्नी व ११ वर्षीय मुलगा जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे): नागरगाव चौफुला ते शिरुर रस्त्यावर हॉटेल कुलस्वामिनीच्या जवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने पती, पत्नी आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पत्नी व मुलाला गंभीर दुखापत झाली असून, दोघांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी संबंधित चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका अपघात कसा घडला…?

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश चंद्रकांत खंडाळे (वय ३५, सध्या रा. चंदननगर, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. आंधळगाव, ता. शिरुर, जि. पुणे) हे आपली पत्नी ज्योती आणि मुलगा सोमराज यांच्यासह टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरुन मूळ गावी आंधळगाव येथे जात होते. दि १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास ते नागरगाव चौफुला ते शिरुर रस्त्यावरील हॉटेल कुलस्वामिनीच्या जवळ आले असता, पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तिघेही जखमी झाले, तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.

पती, पत्नी व मुलाला दुखापत…

या अपघातात निलेश खंडाळे यांच्या चेहऱ्याला आणि कमरेला दुखापत झाली. तर त्यांची पत्नी ज्योती खंडाळे यांच्या डोक्याला व डाव्या हाताला दुखापत झाली असून, कमरेला आणि उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्यांचा ११ वर्षीय मुलगा सोमराज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्याही उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

जखमींना मदत न करताच चालक पसार…

अपघातानंतर संबंधित चारचाकी वाहनाचा चालक जखमींच्या मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरुन निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाची आणि चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातानंतर जखमींना मदत न करता निघून गेलेल्या चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.

अपघातानंतर १८ दिवसांनी गुन्हा दाखल

या प्रकरणी निलेश चंद्रकांत खंडाळे यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस ठाण्यात दि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

3 तास ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

3 तास ago

औषधांच्या वेळा पाळण्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळ्णं हे जास्त फायद्याच

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…

3 तास ago

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका नकोत! विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…

4 तास ago

शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…

11 तास ago

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुफान हाणामारी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…

11 तास ago