महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यासू आवाज हरपला

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा सखोल अभ्यास असलेल्या प्रताप आसबे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. राजकारणाकडे अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व पत्रकारिता क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

4 तास ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

4 तास ago

औषधांच्या वेळा पाळण्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळ्णं हे जास्त फायद्याच

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…

5 तास ago

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका नकोत! विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…

5 तास ago

शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…

12 तास ago

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुफान हाणामारी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…

12 तास ago