शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या श्री भैरवनाथ मोफत वाचनालय येथे शिक्रापूर व परिसरातील नागरिकांमध्ये वाचन चळवळ वाढावी तसेच सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक असणारी पुस्तके ग्रंथालयास भेट देण्याचे आवाहन ग्रंथपाल संतोष काळे यांनी केले असताना युवा उद्योजक ऋषिकेश केवटे याने त्याच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रंथालयास अध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट दिला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या ग्रंथालयास पुस्तके, ग्रंथ भेट देण्याचे आवाहन करण्यात आलेले असताना युवा उद्योजक ऋषिकेश केवटे याने त्याचे वडील कै. भाऊसाहेब नारायण केवटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त ग्रंथालयास अध्यात्मिक ग्रंथांचा मोठा संच वाचनालयास भेट दिला आहे.
याप्रसंगी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, ग्रंथपाल संतोष काळे, समता परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य उषा राऊत, सामाजिक कार्यकर्ते तानाजी राऊत, पोपटराव गायकवाड यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी ग्रंथपाल संतोष काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…