शिरूर तालुका

सामाजिक बांधिलकी जपत विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यां सोबत परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधन साजरे करत सामाजिक भान जपले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधनच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी सेवाधाम मधील विशेष विद्यार्थ्यांना औक्षण करत राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. दरम्यान विशेष विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रेमाने बहिणीकडून राखी बांधून घेत बहिणीला शैक्षणिक साहित्य भेट देत बहिण भावांच्या प्रेमाचा रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्तीचे उपक्रमशील शिक्षक सचिन पवार सेवाधामचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल, कलाशिक्षक संजय पोटफोडे, उपस्थित होते. तसेच यावेळी मानसशास्त्रज्ञ नृसिंह कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रक्षाबंधन बाबत माहिती दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

16 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

20 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

20 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

20 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

20 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

21 तास ago