शिरूर तालुका

शिरूर शहरातील पाचकंदील चौकात बेकायदेशीरपणे बांधकाम…

भोगवटा प्रमाणपत्र रद्द व मंजूर बांधकामाव्यतिरिक्त झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची नागरीकांची मागणी..

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील नगरपरिषद हद्दीतील पाच कंदिल चौकात बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या बड्या बांधकामधारकावर नगरपरिषद मेहरबान का असा सवाल उपस्थित होत आहे.

सदर बांधकामधारकानी इमारत उभी करत असताना कुठल्याही प्रकारची पार्कींगची व्यवस्था केलेली नाही. बांधकामधारकानी शिरुर नगरपरिषदेकडून घेतलेल्या बांधकाम परवानगीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे. याबाबत वारंवार लेखी तक्रारी प्राप्त होत असताना देखील कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भुमीपुत्र प्रतिष्ठाणच्या वतीने सोमवार (दि. २४) मार्च पासुन नगरपरिषद कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले आहे.

शिरुर नगरपरिषद हद्दीतील पाच कंदील चौक येथे बांधकामधारकानी बांधकाम करताना कुठल्याही पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने स्थानिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच सदर इमारतीत एक मोठी बॅंक सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर लागत आहेत. स्थानिकांसह अनेकांनी वारंवार नगरपरिषदेकडे पार्किंग संदर्भात तक्रारी केल्या असताना देखील सदर बांधकामावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही. याबाबत मा. जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन शाखा यांनी नगरषरिषदेला कार्यवाही करण्यासंदर्भात पत्राद्वारे कळविले होते. तरी सदर बांधकामधारकावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. एकप्रकारे नगरपरिषद प्रशासन सदर बांधकामधारकाला पाठीशी घालण्याचे काम करत असून याबाबत सदर बांधकाम धारकाला दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे व मंजूर बांधकामाव्यतिरिक्त झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी सोमवार (दि. २४) मार्च पासून नगरषरिषद कार्यालयाबाहेर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच कंदील चौकातील अनधिकृत बांधकाम,त्यामुळे निर्माण होणारी पार्किंगची अडचण ,यामुळे तेथील व्यापारी वर्गाचे होणारे हाल या प्रश्नांमुळे श्रीराम सेना अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष स्वप्निल रेड्डी आणि मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी अनोख्या पद्धतीने या अनाधिकृत बांधकामाविषयी निषेध नोंदवला आहे. त्यांनी “HDFC बँकेच्या पार्किंगमधून चारचाकी किंवा दुचाकी गाडी काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका!” असे आव्हानही दिले होते. तरीही अद्याप शिरुर नगरपरिषदेला जाग आली नसून अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आता लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आमदार माऊली कटके यांनाही याबाबत लेखी निवेदन दिले असून कारवाई आता हे अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

11 मिनिटे ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

22 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago