शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यातच उन्हाचा तडाका वाढला असून वाढत्या उन्हामुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात व शिक्षकांवर होणाऱ्या गंभीर गुन्ह्यात चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे ,तालुका शिक्षक संघाचे शिक्षक नेते संतोष शेवाळे,सरचिटणीस आपासाहेब रसाळ,सह सरचिटणीस सोमा गायकवाड,विलास जासूद,खंडू निचित ,धन्यकुमार धस व शिक्षक बांधव उपस्थित होते.

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील काही शिक्षकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे. शिक्षक हा समाजापुढे आदर्श असून, या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत असताना शिक्षक समन्वय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांस विश्वासात घ्यावे, अशी मागणी करून, गुन्हे दाखल झाल्यानंतर कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला असून, उन्हाची तीव्रता लक्षात घेता दुपारच्या सत्रात शाळा घेतल्यास उन्हाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ शकतो. तर उन्हाची तीव्रता 40° पेक्षा पुढे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावे तशी मागणी ही या निवेदनात करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago