शिरूर तालुका

हरवलेला मोबाईल पोलीसांच्या इमानदारीने परत; वाहतूक अंमलदार कदम पोलिसांचे कौतुक

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नागरिकांप्रती कर्तव्यपरायणता याचे उत्तम उदाहरण शिरूर शहरात घडले. शिरूर शहरातील विद्याधाम चौकात हरवलेला मोबाईल फोन शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार आप्पासाहेब कदम यांनी प्रामाणिकपणे परत करत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

लक्ष्मण कोळी रा. शिरूर, यांचा मोबाईल (दि. १६) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता विद्याधाम चौक परिसरात हरवला होता. काही वेळानंतर मोबाईल सापडल्यानंतर त्यावर मालकाचा फोन आला. त्यावेळी अंमलदार कदम यांनी स्वतःहून संपर्क साधत मी कदम पोलीस बोलत आहे. तुमचा मोबाईल विद्याधाम चौकात सापडला आहे. तुम्ही तो ओळख करून घेऊन जावा, असे स्पष्ट सांगून मोबाईल त्यांच्या ताब्यात परत दिला. अचानक हरवलेला मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने श्कोळी यांनी दिलासा व आनंद व्यक्त केला. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत झाला असून, आप्पासाहेब कदम यांच्या प्रामाणिक वर्तणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेल्या वस्तू मिळाल्यानंतर त्यांचा गैरवापर होण्याच्या घटना वाढताना दिसतात. मात्र, शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार कदम यांनी प्रामाणिकपणे मोबाईल परत करून केवळ कर्तव्य निभावले नाही, तर समाजात प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.शिरूर शहरातील सामाजिक संस्थांकडून तसेच नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात असून, “शहरात असे प्रामाणिक अधिकारी हेच खरी शिरूर पोलीसांची ओळख आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

1 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

2 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

2 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

2 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

5 तास ago