मुख्य बातम्या

उच्च न्यायालयाचा दणका: न्हावरा फाटा–करडे रस्ता रूंदीकरण प्रकरण “जैसे थे” परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश

शिरूर (अरुणकुमार मोटे): न्हावरा फाटा ते करडे या रा.मा.११८ रस्त्याचे रूंदीकरण एमआयडीसीकडून ७ मीटरवरून १५ मीटरपर्यंत सुरू करण्यात आले होते. मात्र, या कामासाठी कोणतीही कायदेशीर अधिग्रहण प्रक्रिया न राबवता शेतकऱ्यांच्या जमिनींवर थेट काम सुरू करण्यात आल्याने प्रभावित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील काम सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल चार आठवड्यांत सादर करण्यास सांगून, तोपर्यंत “जैसे थे” परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रकरणात ऍड. दिलीप बोडके, ऍड. निनाद मगर व ऍड. उदय सरोदे यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले.

याबाबत अधिक माहिती देताना शिरूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. उदय सरोदे म्हणाले, “शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही. मात्र विकास कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवा. एमआयडीसीने कोणतीही अधिग्रहण प्रक्रिया न करता थेट काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. न्यायालयाच्या आदेशामुळे आता कुणाचेही नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे विकासकामे कायदेशीर चौकटीत होतील. त्यामुळे न्याय मिळेल व विकासही अडणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago