शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान राबवणार; बाळासाहेब म्हस्के

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर शुक्रवार (दि २) ऑगस्ट रोजी शिरुर येथे सकाळी ११:०० वा घेण्यात येणार असल्याची माहीती शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.

 

दिव्यांगासाठी आरोग्य विभाग, आधार कार्ड काढणे,सेतु मधील सर्व प्रकारचे दाखले, मतदार नोंदणी, संजय गांधी योजनेचा लाभ, पंचायत समितीमार्फत ५ % अंपग निधी, समाजकल्याणमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना इत्यादी लाभ गरजुंना या शिबिरामध्ये देण्यात येणार असल्याचे अव्वल कारकुन निलेश खोडसकर यांनी सांगितले आहे.

 

दिव्यांगासाठी महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबीर हे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरुर येथील तिसरा मजला येथे होणार आहे. या दिवशी शिरुर तालुक्यातील दिव्यांगासाठी असलेल्या योजनेचे लाभ दिव्यांगाना देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी सर्व माहितीसह उपस्थित राहणार असुन या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिरुर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

शिरूर शहरात जुगार खेळणाऱ्यांवर ४ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे

शिरुर येथे राष्ट्रवादीकडुन केंद्र सरकारच्या निषेधार्थ नायब तहसीलदारांना लेखी निवेदन

शिरुर तालुका डॉट कॉम; च्या बातमीचा प्रभाव; शिरुर न्यायालयाने केली नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

56 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago