शिरूर तालुका

शिरूरमध्ये मनसे आक्रमक; बँकिंग व्यवहार मराठीतच करण्याची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विविध बँकांमध्ये मराठीतून पाट्या आणि बँकिंग व्यवहार करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शासन निर्णयानुसार प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याने बँकांनी याचे तातडीने पालन करावे, अशी मागणी करत मनसेच्या शिष्टमंडळाने विविध बँकांना निवेदन दिले आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकिंग व्यवहार मराठीतच करण्याच्या सूचना दिल्यानंतर, स्थानिक मनसैनिकांनी यावर तात्काळ अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, तालुका संघटक अविनाश घोगरे, शहर अध्यक्ष अॅड. आदित्य मैड, शहर सचिव रविराज लेंडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉ. वैशाली साखरे, तालुका संघटक शारदा भुजबळ, मनसेचे शहर उपाध्यक्ष गौरव शिंदे, अण्णासाहेब दौंडकर, अस्लम शेख, संतोष कोठावळे आदींनी विविध बँकांसमोर घोषणाबाजी करत निवेदन दिले.

शिरूर शहरातील भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय, अॅक्सिस बँक, आयडीएफसी, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेच्या शिरूरमधील शाखांमध्ये जाऊन शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा विभागाने १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय क्रमांक भासस-२०१८/प्र.क्र.५०/माषा-१ अन्वये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन महामंडळे आणि शासन अनुदानित कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला आहे. त्यानुसार अभ्यागतांना मराठीतून सेवा देणे आणि दर्शनी भागात मराठीतून फलक लावणे बंधनकारक आहे.

मनसेच्या प्रमुख मागण्या: 

१) बँकेतील भरणा पावती, कर्ज अर्ज इत्यादी कागदपत्रे मराठीत छापलेली असावीत,कर्ज मंजुरी व ना हरकत प्रमाणपत्र मराठीतून स्वीकारावेत. बँकेतील कर्मचारी ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा. 8 दिवसांत सर्व कागदपत्रे मराठीतून करण्याची अंमलबजावणी करावी. शासन निर्णय आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे, शेतकरी आणि ग्रामीण भागातील खातेदारांना सहकार्य करावे, सर्व बँक शाखांमध्ये मराठीत सूचना फलक लावावेत.

मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत बँक व्यवस्थापनाला इशारा दिला की, मराठी भाषेचा अवमान केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकेची असेल. त्यामुळे सर्व बँकांनी तातडीने सुधारणा कराव्यात, अन्यथा मनसे अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जांभूळ खाताना या चुका करु नका

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या…

5 तास ago

अशी घ्या दातांची काळजी

आपल्या एकंदर आरोग्याचा, सुद‍ृढतेचा आपल्या दातांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. दात चांगले असतील तर पचनसंस्थाही…

5 तास ago

ताक पितानाची एक लहानशी चूक तुम्हाला पोहचवू शकते दवाखान्यात

ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके पेय मानले जाते. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर…

5 तास ago

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक! पाण्याचा थेंब न थेंब अडविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतून मजुरांना काम; एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत – महसूल मंत्री चंद्रशेखर…

5 तास ago

झिशान सिद्दीकी मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी; सिद्धार्थ कांबळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी!

मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय…

6 तास ago

न्यायालयाच्या दारात गोळीबार, राज्यात कायद्याचे भय संपले! महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : न्यायालयाच्या दारात गोळीबार होणे हे राज्यातील अराजकतेचे लक्षण आहे. गुन्हेगारांना कायद्याचे किंवा पोलिसांचे…

6 तास ago