क्राईम

शिरूर पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार तडीपार

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार, शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील कर्डे-सरदवाडी एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या संकेत महामुनी टोळीतील सदस्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

या टोळीतील गुन्हेगार घ्या उर्फ अभिषेक हनुमान मिसाळ (वय २३), रा. सोनार आळी, शिरूर,शुभम दत्तात्रय दळवी (रा. प्रितम प्रकाशनगर, शिरूर),गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय ३०), रा. गोलेगाव, ता. शिरूर यांना तडीपार करण्यात आले आहे.या आरोपींनी टोळीप्रमुख संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी, ता. शिरूर) याच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी कृत्ये केली आहेत.या टोळीने शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच रांजणगाव एमआयडीसी आणि शिरूर तालुक्यात गावठी पिस्तुलाचा वापर करून खुनाचा प्रयत्न, धमकी, शिवीगाळ, बेकायदा जमाव जमवणे, गंभीर दुखापत करणे, अवैध हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे यांसारखे अनेक गुन्हे केले आहेत.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या टोळीविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शिरूर पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी 2 एप्रिल 2025 पासून पुढील दोन वर्षांसाठी या आरोपींना पुणे जिल्हा (पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासह), तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला.

शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्र तसेच शिरूर तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहतील.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार परशराम सांगळे, सचिन भोई, महेश बनकर, रामदास बाबर, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, निखील रावडे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरीस आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने उचललेले हे कठोर पाऊल भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

13 तास ago