शिरूर तालुका

अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गावर बाभुळसर खुर्द गावात असणाऱ्या पिरसाहेब मंदीराच्या समोर सकाळी आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकडावर बसुन गप्पा मारणाऱ्या चार व्यक्तींना करडे येथुन रांजणगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्याने रामदास किसन शिंदे (वय 55) या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत महादु विठठल वांझुळ, (वय 48) रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन आशिष योगेंद्र बांदल (रा.करडे ता. शिरूर जि. पुणे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि 29) रोजी सकाळी 8 च्या सुमारास 1) रामदास किसन शिंदे, 2) संतोष नंदु वाळके, 3) अकबर अलीभाई शेख, महादु विठठल वांझुळ हे सर्व (रा. बाभुळसर खुर्द ता. शिरुर, जि. पुणे) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकडा वर बसुन बोलत असताना आरोपी आशिष योगेंद्र बांदल (रा.करडे ता. शिरूर जि. पुणे) हा करडे येथुन रांजणगावच्या दिशेने त्याच्या हुंदाई कंपनीच्या आय 20 कार क्रं एम एच 12 पी सी 5333 ने भरधाव वेगाने चाललेला असताना बाभुळसर खुर्द येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकडाला त्याच्या कारची जोरदार धडक बसल्याने वरील चार जण जखमी झाले.

या अपघातात फिर्यादी महादु वांझुळ यांचा पाय फॅक्चर झाला असुन त्यांच्या डोक्यास व कमरेस मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच संतोष वाळके आणि अकबर शेख यांना किरकोळ दुखापत झाली असुन रामदास शिंदे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर कारचालक आशिष बांदल हा कार जागीच सोडुन पळुन गेला आहे. रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

9 तास ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

11 तास ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

2 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

2 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

3 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

3 दिवस ago