शिरूर तालुका

शिक्रापूरच्या विद्याधामच्या अठरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस दोन व सारथीसाठी सोळा विद्यार्थी लाभार्थी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत दोन तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत सोळा विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 4 वर्षे दरवर्षी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत शंतनू खंडागळे व सेजल अहिर या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून सर्व विद्यार्थ्यांना 5 वर्षे प्रत्येक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या अनुजा खपले, ज्ञानेश्वरी डफळ, श्रेयल मांढरे, ओंकार भापकर, श्वेता सोरगेकर, साहिल शिंदे, श्रद्धा देशमुख, श्रेया देशमुख, स्वप्नील केरले, हर्षदा पाटील, तेजस चेडे, संजली वाळूंज, ईश्वरी धुमाळ, ईश्वरी दरेकर, कृष्णा जंगले, प्रज्ञा ढगे या विद्यार्थ्यांना 4 वर्षे प्रत्येक वर्षी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश बोरा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे, प्राचार्य सोनबापू गद्रे, उप प्राचार्य सुनील थोरात, पर्यवेक्षक सुनील शेळके यांनी अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

8 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

20 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

21 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago