शिरूर तालुका

कान्हूर मेसाई येथे रस्त्याची दुरावस्था, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

चौधरी वस्ती ते फलकेवाडी रस्त्याची दुरावस्था; शालेय विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय

पाबळ (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील कान्हूर मेसाई येथील फलकेवाडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विसरल्यामुळे व पूर्वीचे खड्डे बुजविताना निकृष्ट दर्जाचे काम याचा परिणाम पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे. चौधरी वस्ती येथे तर रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. पुढाऱ्यांचे नातेवाईक असलेले ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमतामुळे तालुक्यातील अनेक नव्याने झालेल्या रस्त्यांना मुदतीच्या आत खड्डे पडले आहेत.

तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी व पाठपुरावा करत आले आहेत परंतु अधिकारी या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहेत. रस्त्यांच्या विकासकामाकडे लोकप्रतिनिधींपासून शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे ऐकत नसल्याचे चित्र आहे. मात्र पावसाळ्यात डागडुजीचे पितळ उघडे पडले आणि डागडुजीच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने पुन्हा खड्ड्यातून प्रवास करावा लागला आहे. चौधरी वस्ती ते फलकेवाडी रस्त्याची वाताहात झाली आहे.

प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. कान्हूर मेसाई येथे येणारे भाविक तसेच नागरिक यांची वर्दळ कमी असुनही रस्त्याची दुरवस्था झाली आहे.तसेच कान्हूर मेसाई परिसरात वाहनांना रस्ता धोकादायक झाला आहे.चढपट्ट्या आणि खड्ड्यांमुळे दुचाकी स्वरांचे अनेकदा अपघात झाले असून मोठ्या वाहनांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दुरुस्तीची अनेकदा मागणी करूनही रस्त्याची झालेली प्रचंड दुरवस्था यामुळे नागरिक प्रशासन विरोधात संताप व्यक्त करत आहेत. या रस्त्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ही अधिकारी घेणार का आणि लोकप्रतिनिधी त्यांना जाब विचारणार का हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

8 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

9 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

9 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

11 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

13 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

13 तास ago