आरोग्य

आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे

आपल्या आजुबाजुला आपण असे अनेक लोक पाहताे जे कायम थंड पाण्याने आंघोळ करतात. मग तो अगदी पावसाळा किंवा हिवाळा असेल तरीही ते आंघोळीसाठी थंडच पाणी घेतात. एवढ्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ हे ऐकूनच अनेकांना हुडहुडी भरते. पण जे हा नियम पाळतात ते मात्र अगदी फिट असतात कारण त्यांच्या प्रकृतीला ते अनुकूल असतं. त्याउलट काही जण गरम पाण्याने आंघोळ करूनही हिवाळ्यातले अर्धे दिवस सर्दी- पडशाने हैराण असतात. त्यामुळेच आंघोळीसाठी कोणतं पाणी घ्यावं हे जर आपण आपल्या प्रकृतीनुसार ठरवलं तर त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१) गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आखडून गेलेले स्नायू मोकळे होऊन रिलॅक्स वाटते.

२) झोप अधिक चांगली येण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर असल्याचे मानले जाते.

३) गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शारिरीक, मानसिक त्रास कमी होतो.

४) श्वसन संस्थेसाठीही गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर मानले जाते.

५) ज्यांना सांधेदुखी, डोकेदुखीचा त्रास असतो, त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करावी.

६) गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण अधिक चांगले होते.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१) थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं.

२) थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे एनर्जी जास्त वाढते.

३) जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात त्यांनी त्वचा आणि केस जास्त चांगले असतात.

४) शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढतो.

५) मनातले नकारात्मक विचार कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

10 मिनिटे ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

14 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

15 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

15 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

15 तास ago