शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने वाळू माफियां किंवा मुरुम माफिया यांच्या विरोधात दिलेली गोपनीय माहिती आणि तक्रारदाराच नाव संबंधित वाळू किंवा मुरुम माफिया पर्यंत सोयीस्करपणे पोहोचवायचं काम तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
शासनाच्या नियमांनुसार तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य आहे. पण शिरुर तालुक्यातील वास्तव अगदी वेगळे आहे. उलट तक्रार करणाऱ्यालाच उघडे पाडून आरोपींचे हात बळकट करण्याचे काम काही अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अवैध धंद्याच्या तक्रारी केल्यावर मिळतेय धमकी…?
शिरुर तालुक्यातअनेक गावातील अवैध धंदे, भ्रष्टाचार, शासकीय योजनांमधील अनियमितता किंवा स्थानिक पातळीवरील गैरप्रकारांची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर तक्रारदारांचे नावच थेट संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचते. परिणामी त्या व्यक्तीकडुन तक्रारदारांवर दबाव, धमक्या आणि दडपशाही करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. यामुळेच तालुक्यातील सामान्य नागरिक अवैध धंद्याविषयी तक्रार करायला धजावत नाहीत. त्यामुळे बेकायदेशीर अवैध धंद्याना याच कारणामुळे उघडपणे चालना मिळत आहे.
कुंपणचं जर शेत खात असेल तर…?
जर प्रशासनानेच गोपनीयता जपली नाही, तर मग सामान्य माणूस न्याय कुणाकडे मागणार…? प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभे राहण्याऐवजी “गुन्हेगारांचे हात मजबूत केले” तर सर्वसामान्य लोकांचं काय…? “अवैध धंद्याची तक्रार करुनही जर प्रशासन तक्रारदाराचेच नाव उघड करत असेल, तर लोकशाहीतील जनतेला दिलेले संरक्षण केवळ कागदावरच आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांची खंत…
“तक्रारदाराचे नावच आरोपींना सांगायचे, मग नागरिकांनी तक्रार करायचीच कशाला? प्रशासन गुन्हेगारांना वाचवतेय की नागरिकांचे रक्षण करतेय…? अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, नाहीतर लोकशाहीची गळचेपी प्रशासनच करीत आहे.”हे प्रकार थांबले नाहीत तर प्रशासनावरील जनतेचा विश्वास पूर्णपणे ढासळेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकाराची जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तक्रारदारांचे प्राण धोक्यात घालणारे असे “गोपनीयता भंग” प्रकार तातडीने थांबले नाहीत. तर शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी
Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास
शिरुर तालुक्यात घरफोडी; ४८ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर…