रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५’ यंदा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. “शिवतीर्थ प्रतिष्ठान” आयोजित या उत्सवाची सुरुवात सोमवार दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी झाला असुन संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ग्रामस्थांना अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करुन झाली. मंगळवार (दि २३) रोजी ग्रामस्थांच्या हस्ते गौरी पुजन कार्यक्रम संपन्न झाला. तिसऱ्या दिवशी बुधवार (दि २४) रोजी प्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांचा स्वरमंची हा कार्यक्रम झाला.
त्याचबरोबर गुरुवार (दि २५) रोजी जादूगार ईश्वर यांचे जादूच्या प्रयोगाने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांना थक्क केले. तर शुक्रवार (दि २६) फुल धमाल विनोदी भटकंती हा कार्यक्रम तर शनिवार (दि २७) लोकप्रिय विनोदी कलाकार अॅड सुभाष यादव यांचा कॉमेडी तडका रंगणार असून महिलांसाठी खास मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार (दि २८) लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तर सोमवारी भव्य दांडिया महोत्सव रंगणार आहे. शेवटच्या दोन दिवसांतही दांडिया महोत्सवाचे आयोजन होणार असून मंगळवार (दि ३०) सप्टेंबर रोजी उत्सवाचा समारोप केला जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बुधवार दि १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. देवीची भव्य मिरवणूक व आरती सोहळा पार पडणार आहे.
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक
रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद
रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…