मुख्य बातम्या

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला होता. मात्र महसूलमंत्री व शासनाने शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेसह शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या पुढाकारामुळे अखेर हा शेतरस्ता खुला झाला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठा विरोध असतानाही कसलाही पोलिस बंदोबस्त नसताना समन्वय साधत तणाव कमी करुन प्रशासनाने व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता खुला केला.

शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी या रस्त्याबाबत आदेश दिला होता. अर्जदाराने कोर्टात कॅव्हेट दाखल केले असतानाही तहसीलदारांचा आदेश अबाधित राहिला आणि महसूल यंत्रणेच्या कठोर भूमिकेमुळे व समन्वयकांच्या मध्यस्थीने रस्ता खुला करण्यास यश आले.

यावेळी मंडलाधिकारी राजेंद्र पोटकुले, ग्राम महसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, कोतवाल सारिका वरे, शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, ॲड सुप्रिया साकोरे, ॲड सागर जोरी, ॲड योगेश बारहाते, पत्रकार रवींद्र खुडे तसेच पिंपरखेड व चांडोह येथील पोलीस पाटील यांच्यासह वादी व प्रतिवादी शेतकरी आणि परिसरातील शंभराहून अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला शेतरस्ता खुला करण्यास विरोध झाला, मात्र शासन व महसूल यंत्रणेची ठाम भूमिका आणि चळवळीच्या समन्वयाने अनेक वर्षांपासून बंद असलेले दोन महत्त्वाचे रस्ते खुले झाले. त्यामुळे शेकडो एकर जमिनींच्या शेतीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, प्रतिवादी शेतकऱ्याच्या दाणे भरलेल्या उभ्या मका पिकाचे जेसीबीमुळे होणारे नुकसान होऊ नये म्हणून, शरद पवळे व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः दोन सऱ्या उपटून देत शेतकऱ्याला मदत केली. या संवेदनशील भूमिकेचे सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी कौतुक केले. हा रस्ता खुला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शेतातच मासवडीचे जेवण देऊन सर्वांचा सत्कार केला. या सामूहिक आनंदसोहळ्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटकर्‍यांनी शेतकऱ्यांच्या आनंदाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago