शिरूर तालुका

शिरुर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्सवात

शिरुर (तेजस फडके) आपल्या पाल्याची तुलना इतर पाल्याशी न करता त्याच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसेच पालकांनी आपल्या आवडीनिवडी आणि इच्छा मुलांवर लादू नये. उलट त्यांच्यावर जबाबदारी दिली तर त्यातून त्यांना शिकायला मिळेल असे प्रतिपादन डॉ स्मिता बोरा यांनी केले.

शिरुर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पाककला,नृत्य, लांबउडी, उंचउडी, बॅडमिंटन, कबड्डी, बुद्धिबळ, फुटबॉल, निबंध लेखन, वाचन, चित्रकला, गायन या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे त्याचे बक्षीस वितरण आज (दि 29) रोजी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे संस्थापक-अध्यक्ष विकास पोखरणा, डॉ स्मिता बोरा आणि संतोष पिसे हे उपस्थित होते.

यावेळी संतोष पिसे यांनी बोलताना विज्ञानाशी मैत्री करताना रोबोटिकस वापर कसा करता येईल हे समजावून घेणं गरजेचं असल्याच सांगितले. तसेच मुलांनो स्वतः प्रयोग करत जा, तुमचे आई-वडील यांनी बनवलेल्या वस्तू प्रदर्शनामध्ये ठेऊ नका. स्वतःचं वस्तु तयार करायला शिका याचा नक्कीच उपयोग होईल असे अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजण करुन करण्यात आली. त्यानंतर नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेतील मुलांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी शिक्षक-पालक संघाच्या पालकांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी व्हिजन इंटरनॅशनल स्कुलच्या सचिव पूजा पोखरणा, शाळेच्या मुख्याध्यापिका पसक्वीन काशी, समन्वयिका सुनंदा लंघे, शिक्षक पालक संघाच्या राणी कर्डिले आणि इतर पालक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी या सर्वांनी मिळुन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पसक्वीन काशी यांनी तर आभार सुनंदा लंघे यांनी मानले.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नवीन मार्केट यार्ड घावटे कॉम्प्लेक्स येथे वाहन कर्जाच्या झालेल्या व्यवहाराचा…

10 तास ago

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या…

15 तास ago

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

छत्रपती संभाजीनगर : एका एसटी बसमध्ये दोन वृद्धांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. संबंधित घटनेचा व्हिडिओ…

15 तास ago

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही…

1 दिवस ago

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय…

1 दिवस ago

विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन शेळ्याही जागीच दगावल्या…

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची…

2 दिवस ago