क्राईम

सणसवाडीत मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे म्हणत कामगाराला बेदम मारहाण

चार जणांच्या टोळक्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे 

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे मी पिंपरी चिंचवडचा भाई असल्याचे म्हणत एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल सस्ते सह 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनी कामगार रामचंद्र शर्मा हे रस्त्याचे कडेला असलेल्या भाजीपाला बाजारातून भाजी घेत असताना एम एच १४ एच एच २ हि फॉरच्यूनर कार येऊन त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. दरम्यान त्यामध्ये बसण्यासाठी चार युवक आले यावेळी एका युवकाने रामचंद्र यांना धक्का मारत शिव्या दिल्या. त्यावेळी रामचंद्र यांनी माझे काही चुकले का असे म्हटले असता कार मधील चौघांनी खाली उतरुन शिवीगाळ, दमदाटी करत हॉकी व बेल्टच्या सहाय्याने रामचंद्र यांना मारहाण केली.

यावेळी मारहाण होत असताना रामचंद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चैन देखील तेथे पाडून गहाळ झाली. यावेळी एकाने तू मला ओळखत नाही का, मी पिंपरी चिंचवडचा मोठा भाई आहे, तुला कापून टाकीन, अशी धमकी देत सर्वजन त्यांच्या जवळील फॉरच्यूनर कारा मध्ये बसून निघून गेले.

घडलेल्या प्रकाराबाबत रामचंद्र सुखारी शर्मा (वय २३) रा. भुजबळ वस्ती सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. नवकाबंगरा ता. बीजईपूर जि. गोपालगंज बिहार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राहुल सस्ते रा. पिंपरी चिंचवड पुणे याच्या सह अन्य 3 जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

17 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

17 तास ago