शिरूर तालुका

शिरूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी; महिलेला तिचे मंगळसुत्र परत

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशनने केवळ अल्पावधीत आरोपींना गजाआडच केले नाही तर चोरट्यांकडून दिड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हस्तगत करून ते संबंधित महिलेस परतही दिले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(दि. 4) जून २०२५ रोजी दुपारी सुमारास वडगाव रासाई येथील शांभवी किराणा दुकानात फिर्यादी सुरेखा अनिल कुंभार (वय ४६) दुकानात काम करत असताना दोन अज्ञात इसमांनी फिल्मी पद्धतीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.

यातील एकाने दुकानात ग्राहक असल्याचे भासवून पाण्याची बाटली मागितली व फिर्यादी पैसे परत करत असतानाच तिच्या गळ्यातील दिड लाख रुपये किंमतीचे (१ तोळा ८ ग्रॅम वजनाचे) मिनी गंठण हिसकावून पळ काढला. बाहेर त्याचा साथीदार विनानंबरच्या दुचाकीवर थांबलेला होता. दोघेही तत्काळ पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी महिलेच्या मुलाने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते फरार झाले. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ३८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, पोलीस अंमलदार पवन तायडे तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. काटेकोर गुप्त माहितीच्या आधारे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आरोपी मारूती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. निंबाळी, ता. आष्टी, जि. बीड),शरद बापु पवार (रा. लोणी सयदमिर, ता. आष्टी, जि. बीड)यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दिड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.

सदर मंगळसूत्र न्यायालयाच्या आदेशानुसार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी सुरेखा अनिल कुंभार यांच्याकडे अधिकृतपणे सुपुर्द करण्यात आले. महिलेला तिच्या आयुष्यातील अमूल्य असलेले दागिने परत मिळाल्याने तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, पोलीस हवालदार बापु मांगडे व पोलीस अंमलदार पवन तायडे यांच्या मेहनतीमुळे हा गुन्हा उघडकीस आला. शिरूर पोलिसांनी केलेल्या या तत्पर व धाडसी कारवाईमुळे महिलेला तिचे मंगळसूत्र परत मिळाले असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

23 मिनिटे ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

2 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

5 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

7 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

7 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

7 तास ago