शिरूर तालुका

करंदीत विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

शिरुर वन विभाग व प्राणी मित्रांच्या प्रयत्नांना अखेर यश

शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यात शिरूर वन विभागाला यश आलेले असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बिछडाला जीवदान देण्यात शिरूर वन विभाग व प्राणी मित्रांना यश आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील कौडाळ मळा येथील अशोक पऱ्हाड हे आज दुपारच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये एक बिबट्याचा बछडा पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळतात वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, पोलीस पाटील वंदना साबळे पाटील, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, श्रीकांत नायकोडी यांनी सदर ठिकाणी धाव घेत विहिरीची पाहणी करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी शिताफीने विहिरीमध्ये पडलेल्या पाण्यातून वर काढले.

यावेळी सरपंच सोनाली ढोकले, उपसरपंच पांडुरंग ढोकले, राजाभाऊ ढोकले, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढोकले, संदीप ढोकले, माजी उपसरपंच लहू दरेकर, चिमाजी साबळे पाटील, भाऊसाहेब ढोकले, योगेश ढोकले, संतोष दरेकर, उत्तम पऱ्हाड, भरत पऱ्हाड, संजय राका, राजेंद्र सुक्रे, स्वप्नील सुक्रे, संदीप कदम, दिवान पऱ्हाड यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान विहिरीतून बाहेर काढलेल्या नर प्रजातीच्या सदर बिबट्याच्या बछड्यावर प्राथमिक उपचार करत वनविभागाच्या वतीने त्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. यावेळी करंदी ग्रामस्थांनी वनविभाग तसेच प्राणीमित्रांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

11 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago