क्राईम

धामारीत दुधाच्या टँकरच्या धडकेत एक ठार एक गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे दुधाच्या टँकरच्या धडकेत एक व्यक्ती ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मच्छिंद्र गुलाब पुंडे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून भरत महादेव गोपाळे या टँकर चालकावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

धामारी (ता. शिरुर) येथील कान्हूर मेसाई धामारी रस्त्याने मच्छिंद्र पुंडे व अंकुश डफळ हे दोघे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एस झेड ५४७५ या दुचाकीहून चाललेले असताना धामारी चौकातील सातपुते हॉटेल समोरुन रस्ता ओलांडत असताना अचानक पाबळ बाजूने शिक्रापूरकडे जाणाऱ्या एम एच १७ बी वाय ९७९६ या दुधाच्या टँकरची दुचाकीला धडक बसून अपघात झाला.

यावेळी अपघातात मच्छिंद्र गुलाबराव पुंडे (वय ५२) रा. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले अंकुश तुकाराम डफळ रा. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पुणे हे गंभीर जखमी झाले असून याबाबत राहुल नाथाभाऊ पुंडे (वय ३3) रा. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टँकर चालक भरत महादेव गोपाळे रा. साबुर्डी ता. खेड जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

4 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago